Tuesday, May 5, 2020

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

चाळीशीच्या उंबरठ्यावर...

आज १३ जुलै माझा वाढदिवस..

सातारा जिल्ह्यातील कवठे गावात जन्म झाला परंतु पूर्ण आयुष्य या पुण्यनगरी मध्ये गेले असल्या मुळे थोडी चौकस बुद्धी आहे असं वाटत... त्याच दृष्टिकोनातून मागील ४० वर्षात आलेल्या काही चांगल्या, वाईट आठवणींची उजळणी करण्याचा आजचा दिवस...

अर्थात या दिवशी माझ्या आई अण्णांना विसरून कस चालेल...

"यशाच्या आकाशात गरुड होऊन जेव्हा भरारी मारत असशील तेव्हा पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील त्या माझ्या गरुडास..".

अभिनव मध्ये असतानां शाळेत कलर ड्रेस घालून मित्रांना रावळगाव चॉकलेट देण्याची मजा काही औरच... पण तेच सगळे चॉकलेट मित्र आज जेव्हा फोन करून शुभेच्छा देतात तेव्हा ती मैत्री नेहमीच आपुलकीची होते..
बघता बघता शाळा संपून कॉलेजच्या कट्टया वर साजरे केलेले वाढदिवस,लो बजेट मधल्या पार्ट्या ( आता लगेच पार्टी मागू नका...) या सारख्या आठवणी नेहमीच तजेला देतात..

सर्व वाय. एम. आणि मॉडर्न कट्टा मित्र मंडळी पुन्हा एकदा धन्यवाद...

मूळचा पिंड माणसं जोडण्याचा असल्या मुळे प्रोफेशनल वाटचालीत अनेक मित्र भेटले आणि त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या... पुढेही अशीच सोबत राहो...

लास्ट बट नॉट द लिस्ट माझी गोड फॅमिली मनिषा तन्मय आणि वेदांत... ज्यांनी माझ्या आयुष्याच्या चढ उतारात तब्बल एक तप माझी साथ दिली...

चाळीशीच्या उंबरठ्या वर मागे वळून पाहताना नक्कीच आनंद होतोय...मस्त चाललंय आमचं...


सर्वांच्या शुभेच्छा अशाच राहो दे...

सर्वांचे आभार...

टीप - (सदर लेख २०१८ मधील आहे) 

9 comments:

  1. योग्य व समर्पक शब्दांची घातलेली सांगड यामुळे तुमच्या मध्ये एक सुंदर लेखनशैली करणारा लेखक दिसला.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर मनोगत👌👍

      Delete
  2. खूपच अप्रतिम लिहिता छान अनुभव 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. Khup chan... Aplya magchya ayushytlya athvni tajya zalya... Khup chan pddhtine rachna mandili ahe tumhi... 👍👍

    ReplyDelete
  4. खूप छान अनुभव अगदी सोप्या आणि सुंदर शब्दात वर्णन केले आहे . .👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप छान, मोजक्या आणि सर्मपक शब्दांत आपल्या भावना आपण व्यक्त केल्या👌👌👌👌....... पार्टी तर द्यावी लागेल🤣🤣😊😊

    ReplyDelete
  6. फार सुंदर शब्दात जीवनाचा आलेख मंांडलाआपण अशीच प्रगती रात रहा.
    आणि उत्तम लेिखाणशाैलीआहे.लिहीत राहा.खुपशुभेच्छा 💐💐i

    ReplyDelete

मनात हजार विचारांचा गुंता, आभाळ मात्र शांत..

मनात हजार विचारांचा गुंता, आभाळ मात्र शांत.. १० ऑक्टोबर | जागतिक मानसिक आरोग्य दिन सचिनच्या ऑफिसमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. कुण...