Tuesday, May 5, 2020

कोथरुड ते शिवणे व्हाया गादिया इस्टेट..

कोथरूड ते शिवणे व्हाया नंदनवन  सोसायटी.. (गादिया इस्टेट )

कोथरूड एक सुंदर आणि सुसंस्कृत  मराठमोळं ठिकाण.शालेय दिवसांपासून अगदी पूर्वीच्या बालगटापासून ते वयाची जवळपास चाळीशी गाठेपर्यंत अनेक चांगल्या वाईट आठवणींचा ठेवा घेत नवीन आयुष्याची वाटचाल शिवणेकडे करत आहे.

अभिनव शाळेतील माझे जुने
बालमित्र  उमेश जावळकर, सचिन  नाणेकर, शिवाजी उभे
महाराज,संभाजी चौधरी,हितेश जैन,अभ्या घुमरे, टम्म्या  आणि इतर  सगळे अजूनही  तेच जुने मैत्रीचे बंध जपणारे माझे मित्र नेहमीच सोबत होते आणि असतील.जावळकरांच्या अंगणात प्लास्टिक बॉल, प्लायवुड ने खेळलेली क्रिकेट असेल किंवा जीत ग्राउंडवर खेळलेल्या विशाल भेलके,नवनाथ टीम बरोबरच्या म्याचेस आणि गादिया टीमने हरलेल्या कटू आठवणी, वाय.म.कॉलेजचे ते मजेदार दिवस आणि हेवनचा चहा... त्याची  मजा काही औरच.

१९९३ जेव्हा नंदनवन सोसायटी (मूळची गादिया इस्टेट)मध्ये शिफ्ट झाल्यावर भेटलेले नवे मित्र निलेश थरकुडे, सचिन आढाव, योगेश दळवी(बाळा), राहुल कुंभार, प्रशांत आवटे (बंटी), गणेश कोळसे (गण्या), सचिन नेवसे आणि इतर सर्वजण कायम स्मरणात राहतील.गार्डन कोर्ट ग्रॉऊंड वर सौदामिनी,आर. म.टीम ला सतत हरवणे आणि परत हरवण्यासाठी निमंत्रण देणं.अभिजित शिंदे आणि सचिन
 बोराडे, विनायक कडूच्या संयुक्त भुसारी आणि भारतीनगर मित्रांशी होणाऱ्या लुटुपुटुच्या स्पर्धा,निवास, वर्पे बंधू,विनायक येनपुरे,विशाल आणि मित्राबरोबरच रात्री व्हॉलीबॉल खेळणं आणि त्यातून जोडली गेलेली मैत्रीची नाती नेहमीच मनाला ताजतवानं करतात.

संजू पवार, बंटी ,बाळा,निलेश आणि गादिया मधल्या मित्रांचा सिंहगड ट्रेक असेल किंवा दिवाळीच्या धुक्यात केलेली प्रामाणिक क्रिकेट प्रॅक्टिस,१९९९ च्या वर्ल्ड कप नंतर केलेल्या चर्चा,अनंता लोणकरांची वेगवान डावखुरी गोलंदाजी, सचिन  आढाव यांचा थरकुडेनी घेतलेला इंटरव्हिव,नेवसे काका,भालेकर काकूंची,आमले आजींची नेहमी असणारी आपुलकीची चौकशी,यातून आयुष्यात अनेक अडचणीना समोरजाण्याचं बळ दिलं हे मात्र नक्कीच.आई वडिलांच्या निधनानंतर केलेल्या अनेक तडजोडी आणि सर्वांची मिळालेली साथ अशीच पुढंही राहो.

मनिषा बरोबर विवाहबद्ध झाल्यानंतरआलेल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या सांभाळताना आलेल्या आठवणी हि याच कोथरूडच्याच ....

दुर्गा (मंगेशची कॉफी )असेल कि राजपूतचा सामोसा, हर्षदची अस्सल  मराठी पदार्थांची मेजवानी, हित्याच्या ४९/९९ मधल्या चहाच्या मेहफिलची  सर  येणार नाही.. व्यावसायिक वाटचालीमध्ये २००८ मध्ये कोथरूड ची नाळ तुटली आणि नशिबाने पुन्हा जुळाली.

आयुष्यातील एक सुखद टप्पा जवळपास ३८ वर्ष याच नंदनवनात गेला.अनेक आठवणी मनात साठवून आणि जोपासत  कोथरूडचा मुक्काम शिवणेला हलवत आहे...

या निमित्ताने  काही  जुन्या  आठवणींना उजाळा..आणि माझ्या सर्व मित्रांनाशुभेच्छा...

13 comments:

  1. Dear Rahul,
    Appreciate your write up.... Nostalgic memories...

    All theee best.

    Regards

    Sandip Deshpande
    (Mumbai)

    ReplyDelete
  2. खूप सुंदर, आयुष्यमध्ये खूप अडचणी येतात, पण जीवाला जीव देणारी मित्र मंडळी आणि फॅमिली बरोबर असले की सगळ काय ठीक हौऊन जात.

    तस आपण खूप कमी वेळ मिळाला, पण मला एक चांगला मित्र मिळाला. तुमी प्रोफेशनल जेवढे छान आहात, त्याचा बरोबर तुम्ही एक माणूस म्हणून खूप छान आहात.

    खूप प्रगती करा पण जसे आहात तसेच रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. सुशांत आनंद खोत

    ReplyDelete
  4. मस्त rahulji असेच लिहित चला

    ReplyDelete
  5. कुटुंब आणि मैत्री या दोघांची सांगड योग्यरित्या घातली की आयुष्य खूप सुंदर होते. खूप सुंदर लेखन.

    ReplyDelete
  6. खूप छान लेखन शैली 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  7. Vayachi 38 varsh tumhi evdhya chotya adhavyat kitii sunder ani mojkya shbdat mandliyy...khrchh khup katukaspad likhan ahe... Bhashashaili, shabdarchna jabjasttt ahe... Keep it up... Well done👍

    ReplyDelete

वर्क लाईफ बॅलन्स काळाची गरज ?

जागतिक महासत्ता बनण्यासाठी जर चीनशी स्पर्धा करायची असेल तर कॉस्ट आणि क्वालिटी यावर करावी लागेल. आपली मानसिकता थोडी बदलावी लागेल. ते कितपत शक...